मुंबई- पुणे महामार्ग उद्या दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत बंद

मुंबई : रायगड माझा वृत्त 

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पुण्याकडे जाणारी वाहतूक उद्या गुरुवारी दोन तासासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईहून पुण्याकडे जाणारा मार्ग दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येईल, असे महामार्ग वाहतूक पोलिसांनी सांगितले.

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर (पुणे वाहिनीवर) खालापूर टोलनाक्याच्या आधी महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा महामंडळ लिमिटेडच्या वतीने ओव्हरहेड गॅन्ट्री बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी दोन तास वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून या दरम्यान पर्यायी मार्ग म्हणून शेडुंग फाटा येथून वाहतूक जुन्या मुंबई- पुणे मार्गावर वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी या पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन महामार्ग वाहतूक पोलिसांनी केले आहे. या कालावधीत अवजड मालवाहू वाहनांना थांबवून ठेवण्यात येईल. त्यामुळे अवजड वाहनचालकांनी आधीच नियोजन करावे, जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही, असेही पोलिसांनी म्हटले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत