मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर दरड कोसळली, मोठी दुर्घटना टळली

कर्जत : रायगड माझा वृत्त 

मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर मंकीहिल परिसरात बोरघाटजवळ ट्रॅकवर दरड कोसळल्याने रेल्वेसेवा विस्कळीत झाली. लोहमार्गावर दरड कोसळली पण सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे.

रेल्वेच्या अगदी समोरच दरड पडली. एक मोठा दगड रेल्वेच्या अगदी समोरच आला. ही रेल्वे कोणती, कोणत्या दिशेला आणि कोणत्या लेनवरून निघाली होती हे अद्याप समजू शकले नाही.

या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी मार्गस्थ झाले. हा ब्रिटीशकालीन लोहमार्ग आहे. या परिसरात सातत्याने दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. मात्र यावर ठोस उपाय योजलेले नाहीत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत