मुंबई बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक घटली

मुंबई : रायगड माझा वृत्त 

Related image

कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबईमध्ये देशभरातून रोज ५५० ते ७०० ट्रक व टेम्पोमधून दोन ते अडीच हजार टन भाजीपाला विक्रीसाठी येत असतो. ६ ते ७ लाख जुडी पालेभाज्या विक्रीसाठी येतात; परंतु ही आवक आता घटली आहे. १० डिसेंबरला फक्त २४७ वाहनांमधून  ७४९ टन म्हणजे  ४ लाख जुडी पालेभाज्याची आवक झाली. वर्षभरातील ही सर्वात कमी आवक आहे.

एक महिन्यापासून सातत्याने जादा आवक होत असल्याने बाजारभाव कोसळले होते. कोबी, फ्लॉवर, वांगी व पालेभाज्या कचऱ्यात फेकून देण्याची वेळ आली होती.  होलसेल मार्केटमध्ये भेंडी २४ ते ३४ रुपये किलो. फ्लॉवर ८ ते १२ रुपये, दुधी भोपळा १४ ते २० रुपये, गवार ३६ ते ४० रुपये, कोबी ६ ते १० रुपये दराने विकला जात आहे. आवक कमी झाल्याने शनिवारपेक्षा १ ते ४ रुपयांनी दर वाढले आहेत. आवक अशीच राहिल्यास शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत