मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंदच !

मुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त

येत्या सोमवारपासून म्हणजेच 23 नोव्हेंबरपासून राज्यातील ९ वी ते १२ वी चे वर्ग सुरू होणार आहेत. मात्र मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व खासगी, सरकारी आणि महापालिकेच्या शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत. महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी हे आदेश दिले आहेत. कारण दिवाळी नंतर पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर हे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईतील शाळा आता नवीन वर्षातच सुरु होण्याची शक्यता आहे.

दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे टेस्टिंग वाढवणं मुंबई महापालिकेसाठी गरजेचं आहे. मुंबई महापालिका आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, “बाजारपेठांमध्ये वाढलेली गर्दी आणि दिवाळीनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता 31 डिसेंबरपर्यंत कोणतीही शाळा सुरु न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाऊन काळात मुंबई महापालिकेने कोविड सेंटर म्हणून अनेक शाळा ताब्यात घेतल्या होत्या. त्यामुळे शाळांचं सॅनिटायझेशन होणं गरजेचं आहे. दरम्यान अनेक शाळांचं सॅनिटायझेशन अजून बाकी आहे. त्यासाठी कालावधी मिळणं हे प्रशासनासाठी आवश्यक आहे.”

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत