मुंबई महापालिकेत काँग्रेस सरस, सत्ताधारी शिवसेनेचा तिसरा क्रमांक

मुंबई : रायगड माझा वृत्त

मुंबई महापालिकेमध्ये सर्वपक्षीय नगरसेवकांच्या पहिल्या वर्षाच्या कामगिरीचा प्रगती अहवाल समोर येत असून यामध्ये पहारेकऱ्याच्या भुमिकेत असलेल्या भाजपपेक्षा विरोधी पक्ष काँग्रेसनेच बाजी मारली आहे. तर सत्ताधारी शिवसेना तिसऱ्या नंबरवर फेकली गेली आहे. प्रजा फाऊंडेशनचा अहवाल प्रसिद्ध झाला असून यामध्ये 227 नगरसेवकांपैकी 37 नगरसेवक गुन्हेगारी पार्श्वभुमीचे आहेत. तर 13 नगरसेवकांना गेल्या वर्षभरात प्रश्नांचा भोपळाही फोडता आलेला नाही.

Congress corporaters won in mumbai corporation, Shivsena's third position | मुंबई महापालिकेत काँग्रेस सरस, सत्ताधारी शिवसेनेचा तिसरा क्रमांक
21 फेब्रुवारी, 2017 मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक झाली होती. यावेळी भाजप आणि शिवसेनेमध्येच खरी चुरस होती. निकालही दोन्ही पक्षांना बहुमतासमिप नेणारे लागले. मात्र, भाजपने माघार घेत पहारेकऱ्याची भुमिका निभावण्याची घोषणा केली होती. यामुळे आपसुकच विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे आले. काँग्रेसने 31 नगरसेवकांच्या बळावर चांगली कामगिरी केली आहे. या अहवालात किशोरी पेडणेकर (81.59), श्वेता कोरगावकर (79.22) प्रीती सातम (79.12) पहिल्या तीन क्रमांकात आहेत.

निवडून आल्यानंतर नवीन नगरसेवकांच्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेणारे हे पहिले प्रगती पुस्तक आहे. प्रजा फाऊंडेशन तयार करीत असलेल्या अहवालाला महापालिका प्रशासनाने यापूर्वीच आव्हान देऊन काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिला आहे.

रस्त्यांच्या नामकरणावरचे प्रश्न सर्वाधिक
नगरसेवकांनी विविध पालिका सभा व बैठकांमध्ये प्रशासनाला विचारलेल्या नागरी प्रश्नांमध्ये बहुतांशी प्रश्न पुन्हा रस्त्यांच्या नामकरणावरचं असल्याचे समोर आले आहे. त्याबरोबरच घनकचरा, इमारत आणि आरोग्याशी संबंधित प्रश्नांचा समावेश आहे. मात्र गेल्या वर्षभरात काही घोटाळे उघड होऊनही त्यावर केवळ 18 प्रश्न विचारण्यात आले होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत