मुंबई महापौर चषक २०१९ दिव्यांग क्रिकेट स्पर्धेचा मानकरी रायगड संघ

मुरूड : अमूलकुमार जैन

मुंबई क्रिकेट असोसिएशन फोर दि डिसेब्लब आयोजित १९वी  मुंबई महापौर चषक २०१९ ह्या दोन दिवशीय दिव्यांग क्रिकेट रायगड संघाने कल्याण संघाचा पराभव करीत स्पर्धेचा मानकरी  ठरला आहे.

मुंबई येथील मुंबई क्रिकेट असोसिएशन फोर दि डिसेब्ल यांनी दादर येथील शिवाजी पार्क येथे 27 फेब्रुवारी व 28 फेब्रुवारी या दोन दिवसीय दिव्यांगासाठी  क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत रायगड जिल्हा दिव्यांग क्रिकेट असोसिएशनने सुद्धा भाग घेतला होता. रायगड संघाने प्रथम नाणे फेक जिंकून कल्याण संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले कल्याण संघाने फलंदाजी करत  12 ओवर्स मध्ये सर्व बाद  86 धावा करत रायगड संघाला 87 धावांचे आव्हान दिले ते रायगड संघाने 9.3 ओवर्समध्ये हे आव्हान सहज पार केले.

या स्पर्धेत रायगड संघाने कल्याण 11संघाला पराजित करून मुंबई महापौर चषकावर आपले नाव कोरून प्रथम क्रमांक पटकावला आहे. हा संघ रायगड जिल्हा दिव्यांग क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष साईनाथ पवार व सचिव आणि व्यवस्थापक शिवाजी पाटील यांच्या मार्गदर्शना खाली मंगेश दळवी कर्णधार, शैलेश पाटील, मंगेश जाधव, महेश चिपळूणकर, सहदेव बरडे, हितेश पाटील, संदीप ठाकूर, विलास कदम, शिद्देश शिर्के, हितेश पाटील, शकील उकये, शिवाजी पालवे, जनार्दन पानमंद यांचा समावेश होता.

रायगड जिल्हा संघाने मुंबई महापौर चषक 2019चा प्रथम मानकरी ठरला आहे.रायगड दिव्यांग संघाने रायगड जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.यापूर्वी रायगड संघाने बीड,रत्नागिरी येथे  झालेल्या स्पर्धेत भाग घेतला होता. तेथेही यांनी आपली कामगिरी दाखवली होती असे रायगड जिल्हा दिव्यांग क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष साईनाथ पवार यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना संगितले

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत