मुंबई महाविद्यालयांमध्ये मिळणार भगवदगीता

मुंबई : रायगड माझा वृत्त

आता राज्यातल्या नॅक ए आणि ए प्लस मान्यता प्राप्त महाविद्यालयांमध्ये भगवदगीता वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता भगवदगीतेचा अभ्यासही करावा लागणार आहे. उच्च शिक्षण विभागाने यासंबंधी परिपत्रक जारी केलं आहे. परिपत्रकानुसार, मुंबई आणि मुंबई उपनगरांमधील 100 महाविद्यालयांमध्ये भगवदगीतेचं वाटप करण्यात येणार आहे.

परिपत्रकात सांगण्यात आल्यानुसार, नॅक मुल्यांकन झालेल्या ए आणि ए प्लस श्रेणी प्राप्त मुंबई आणि मुंबई उपनगरांमधील १०० महाविद्यालयांमध्ये भगवदगीतेचं वाटप केलं जाणार आहे. यासाठी लागणाऱ्या 100 भगवदगीतेचे संच संबंधित महाविद्यालयांमध्ये वाटप करण्याचे आदेश प्राचार्यांना देण्यात आले आहे.

तसेच सरकारच्या निर्णयावर टीका करत कपिल पाटील म्हणाल की, ‘जिथे भाजपची सत्ता आहे तिथे हा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात असं काही झालं नव्हतं. पण आता इथंही सुरू झालं आहे. या सगळ्यातून संघीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जर धर्माचा प्रसारच करायचा असेल तर मग सगळ्याच धर्माचे ग्रंथ वाटायला हवे.’

सरकारच्या या निर्णयाचा आता विरोधकांकडून कडाडून विरोध केला जात आहे. ‘आमचा भगवतगीतेला विरोध नाही मात्र महाविद्यालयात ती आणू नये,’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले. तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये धर्मनिरपेक्षता असावी. त्यामुळे सरकारला या आदेशावर पुन्हा एकदा विचार करायला हवा, असं विद्यार्थी संघटनांचं मत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत