मुंबई : रेल्वे रुळाला तडा गेल्याने हार्बर वाहतूक उशिराने

मुंबई  : रायगड  माझा वृत्त 

मशीद रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पनवेल आणि मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक उशिराने सुरू असल्याने प्रवाशांना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मनस्ताप सहन करावा लागत आहे.

आज सकाळी साडेसातच्या सुमारास रेल्वे रुळाला तडा गेल्याचे लक्षात आले. रेल्वे प्रशासनाकडून रुळ दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू करण्यात आले. दुरूस्तीच्या कामाला काही वेळ लागल्याने रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले. पनवेल आणि मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने सुरू आहे. गेल्या आठवड्यात खारघर रेल्वे स्थानकात लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सीएसएमटीच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत