मुंबई विमानतळाचा रेकॉर्ड

रायगड माझा
मुंबई विमानतळासाठी २०१७ हे वर्ष फारसं चांगलं राहिलं नाही. उशिराने उड्डाण करण्याचा वाईट ‘रेकॉर्ड’ मुंबई विमानतळाच्या नावावर जमा झाला आहे. मागील वर्षी या विमानतळावरून एक तृतीयांश विमानांची उड्डाणे उशिराने झाली असून डिसेंबर महिना हा सर्वात ‘वाईट’ राहिला आहे.
सर्वात व्यग्र विमानतळांच्या यादीत मुंबई विमानतळ देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, फ्लाइट शेड्युलमध्ये या विमानतळाची कामगिरी दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. २०१३ साली २३ टक्के उड्डाणे उशिराने झाली होती. दरवर्षी हा आकडा वाढत असून गेल्या वर्षी तो ४७ टक्क्यांपर्यंत गेल्याचे दिसले. जीव्हीके पॉवर अँड इन्फ्रास्ट्रक्चर अंतर्गत मुंबई विमानतळाचा कारभार चालतो. गतवर्षी ४७ टक्के फ्लाइट नियोजित वेळेपेक्षा उशिराने मुंबई एअरपोर्टवर पोहोचल्या तर ४४ टक्के फ्लाइटना मुंबई विमानतळावरून निघायला उशीर झाला.
थंडीच्या दिवसात दिल्लीत पडणाऱ्या धुक्क्यामुळे यापूर्वी मुंबईच्या फ्लाइट शेड्युलवर परिणाम होत असे. मात्र, २०१७ मध्ये दिल्लीत केवळ दोनच दिवस दाट धुके होते. त्यामुळे तेथील वातावरणाचा मुंबई विमानतळाच्या सेवेला फटका बसला असे म्हणता येणार नाही, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.