मुंबई विमानतळाला ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतराराष्ट्रीय विमानतळ’ असे नाव द्या!

मुंबई : रायगड माझा वृत्त 

मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावात बदल करून ते ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतराराष्ट्रीय विमानतळ’ असं पूर्ण नाव देण्यात यावं अशी मागणी करत शिवसेना आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वात एक विराट मोर्चा आज काढण्यात आला. गेली चार वर्ष शिवसेना सतत या मागण्या करत करत आली आहे. मात्र या मागण्या मान्य केल्या नाहीत तर विमानतळ बंद पाडू असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

सध्या विमानतळाला ‘छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असं नावं आहे. मात्र हा महाराजांचा अपमान असून विमानतळाला ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे पूर्ण नाव द्यावे. विमानतळासमोर छत्रपतींचा पुतळा नुसताच न उभा करता महाराजांच्या कार्याला लक्षात आजूबाजूच्या देखाव्यासह पुन्हा उभारावा. पश्चिम महामार्गावर असलेल्या छत्रपतींच्या पुतळ्यावर मेघडंबरी उभारणे, गड किल्ल्यांची प्रतिकृती उभी करणे अशी मागणी आम्ही गेली चार वर्ष करत आहोत असे अनिल परब यांनी सांगितले.

तसेच या विमानतळाचे कंत्राट देण्यात आलेली जीवीके (GVK) कंपनी वारंवार छत्रपतींचा अपमान करत आहे. त्यांना महाराजांबद्दल आदर नाही असंच यातून दिसत आहे. मात्र महराजांचा आणखी अपमान शिवसेना सहन करणार नाही. मागण्या मान्य न झाल्यास विमानतळ बंद पाडू असा इशारा त्यांनी दिला.

शिवसेनेच्या इशाऱ्यानंंतर व्यवस्थापन हादरलं, कामाला लागलं

शिवसेनेचा विराट मोर्चा आणि दणदणीत इशाऱ्यानंतर ‘जीवीके’चे कंपनी व्यवस्थापनाचे धाबे दणाणले. विमानतळाला पूर्ण नाव देण्याची प्रक्रिया दुपारपर्यंत पूर्ण होऊन त्याची लवकरच अमलबजावणी करू, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. तसेच महामार्गावरील पुतळ्याचे सुशोभीकरण, मेघ डंबरी, किल्ल्याची प्रतिकृती याचे डिझाईन १५ दिवसांत तयार करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवू आणि त्यांनी मंजुरी दिली की तात्काळ काम सुरु करू, असं देखील व्यवस्थापनाकडून कळवण्यात आलं आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत