मुंबई: व्यापाऱ्याच्या हत्येप्रकरणी मेहतांच्या माजी सचिवाला अटक

मुंबई : रायगड माझा वृत्त

मुंबईतील हिरे व्यापारी राजेश्वर उदानी यांच्या हत्येप्रकरणी सचिन पवार याला अटक करण्यात आली आहे. पवार हा गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचा माजी सचिव आहे. या प्रकरणात एका टीव्ही अभिनेत्रीचीही चौकशी करण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

उदानी हे २८ नोव्हेंबरपासून बेपत्ता होते. मुंबईतील पूर्व द्रूतगती महामार्गाजवळ त्यांची कार सापडली होती. त्यांच्या नातेवाईकांनी पंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. ४ डिसेंबरला पनवेलजवळील नेरे गावातील जंगलात त्यांचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी केल्यानंतर पवारला अटक केली. तसंच उदानींच्या हत्येत सहभाग असल्याच्या संशयावरून पोलीस एका टीव्ही अभिनेत्रीचीही चौकशी करत आहेत, असं समजतं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत