मुंबई शिक्षक मतदारसंघातून अनिल बोरनारे यांचा अर्ज दाखल

पनवेल : साहिल रेळेकर 

अनेक राजकीय पक्षांनी या निवडणुकीत जरी घूसखोरी केली तरीदेखिल  सर्व शिक्षक अनिल बोरनारे यांनाच निवडून देतील  वेणुनाथ कडु यांनी केले.महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मुंबईचे उमेदवारअनिल बोरनारे यांनी देखील मुंबई मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
मागील वर्षी या संघटनेने भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला होता परंतु यावर्षी संघटनेने मुंबई शिक्षक संघ निवडणुकीसाठी  अनिल  बोरनारे यांना स्वतंत्र उमेदवारी जाहिर केली आहे.
मुंबई मध्ये हजारो शिक्षक हे अतिरिक्त झाले असून त्यांच्या सेवाशक्तिचा प्रश्न निर्माण झाला आहे व अनेक शासकीय अडचणी उद्भवत आहेत तसेच सर्वात महत्वाच म्हणजे मुंबई समवेत सर्वत्र महाराष्ट्रभर शिक्षक ज्याची आतुरतरने वाट बघत आहेत त्या मेडिकल बिलाचा प्रश्न निर्माण झाला आहे असे अनेक प्रश्न श्री बोरनारे यांनी उपस्थित केले व यावर शासनाकडे वारंवार पाठपुरावा करुन देखील शासनाने आजवर फक्त गाजर दाखविले अशी परखड टिका देखील श्री बोरनारे यांनी यावेळी केली.
प्रसंगी गेली 18 वर्षे शिक्षकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संजीवनी ताई रायकर व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष वेणुनाथ कडु तसेच संघटनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही राजकीय पक्षाची नोंदणी नसून देखील शिक्षक संघाचे स्वतंत्र अस्तित्व असलेली संघटना अपक्ष म्हणून कार्यरत आहे कारण शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी आम्ही भांडतोय व यापुढेही भांडत राहणार असे वक्तव्य श्री बोरनारे यांनी केले.
अनेक राजकीय पक्षांची यात घूसखोरी जरी झाली असेल तरीदेखील यापूर्वी शिक्षकांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या उमेदवारांना निवडून दिले आहे व आगामी निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांना डावळून सर्व शिक्षक वर्ग  अनिल बोरनारे यांना मुंबई मतदार संघातून निवडून देतील असा विश्वास  वेणुनाथ कडु यांनी प्रकट केला आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत