मुंबई सत्र न्यायालयात आग

रायगड माझा

मुंबईतील आगीचे सत्र सुरूच असून ते थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येते. कमला मिलमधील अग्नितांडवाची घटना ताजी असताना आज सकाळी साडेसातच्या सुमारास मुंबई सत्र न्यायालय परिसरात आग लागली.
मुंबई सत्र न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. सध्या तिथे अग्निशमन दलाचे कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागली याचे करणा अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, सकाळची वेळ असल्यामुळे न्यायालयाची ही इमारत बंद असल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, मुंबईत वारंवार आगीच्या घटना घडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत