मुंबई सेंट्रल स्थानकावर विद्यार्थिनीचा विनयभंग

मुंबई : रायगड माझा वृत्त

देशभरात लैंगिक शोषणाविरुद्ध आवाज उठवला जात आहे. मात्र, यानंतरही विकृतांचा त्रास काही कमी झालेला नाही. मुंबई सेंट्रल स्थानकात एका विकृताने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.

मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाच्या फूटओव्हर पुलावर ही घटना घडली. पुलावर उभ्या असलेल्या दोन शाळकरी विद्यार्थिनींपैकी एकीला या विकृताने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. या घटनेची तक्रार दाखल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी या विकृताला अटक केली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत