मुंबई 1993 साखळी बॉम्बस्फोटातिल मास्टरमाईंड अबू बकरला दुबईतून अटक

मुंबई : रायगड माझा ऑनलाईन 

Image result for 1933 mumbai blast

मुंबई शहरात 1993मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड अबू बकर याला अटक करण्यात भारतीय तपास यंत्रणेला यश आले आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी अबूला दुबईत अटक केली. पाक व्याप्त काश्मीरमध्ये प्रशिक्षण, RDX भारतात आणणे आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊन इब्राहिम यांच्या दुबई येथील घरात तयार झालेल्या कटात अबू बकरचा सहभाग होता.

अबू बकर हा मुंबईत 1993मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या कटातील एक प्रमुख आरोपी आहे. त्याचे पूर्ण नाव अबू बकर अब्दुल गफूर शेख असे आहे. तो पाकिस्तान आणि युएईमध्ये राहतो. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीच्या आधारे त्याला दुबईत अटक करण्यात आली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत