मुकबधीर मुलीचा विनयभंग; तरुण पोलिसांच्या ताब्यात

राजगुरूनगर : रायगड माझा

ठाकरवाडी (जैदवाडी, ता. खेड) येथे डोंगरावर जनावरांना चारण्यासाठी घेऊन गेलेल्या एका 22 वर्षीय मुकबधीर मुलीला मारहाण करुन तोडांत बोळा घालुन तिचा विनयभंग केला. ही घटना आज (गुरुवारी) सकाळी अकराच्या सुमारास घडली. दरम्यान, ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मुकबधीर मुलींवरील अतिप्रसंग टळला. विनयभंग करणाऱ्या तरुणाला ग्रामस्थांनी पळून जाताना पकडून बेदम चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. हफिजल हिदाई शेख (वय 23, सध्या रा. मंचर, ता. आंबेगाव, मुळ रा. मुर्शिदाबाद कोलकत्ता) असे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

जैदवाडीच्या ठाकरवाडीमध्ये राहणारी 22 वर्षीय मुकबधीर मुलगी नेहमीप्रमाणे शेळ्या आणि दुभती जनावरे घेऊन डोंगराजवळील माळरानातजनावरांना चारण्यासाठी घेऊन गेली होती. त्यावेळी मुकबधीर मुलगी एकटीच पाहुन हफिजलने तिला चारीत ओढुन मारहाण केली. तिचा गळा दाबत तोंडात ओढणीचा बोळा कोंबला व विनयभंग करीत असताना तरुणीने जोरदार प्रतिकार केला. दरम्यान, घरच्यांनी व इतरांनी ही घटना बघितल्याने तरुणाने घटनास्थळावरुन पळ काढला मात्र, नागरिकांनी त्यास पकडले व जबरदस्त जोप देत त्याला खेड पोलिसांच्या स्वाधीन केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत