मुक्ता, मेघा आणि हमीद या तिघांच्या सुरक्षेसाठी ‘एक्स’ दर्जाचं संरक्षण!

दिवंगत ज्येष्ठ कामगार नेते आणि विचारवंत गोविंद पानसरे यांची सून मेघा पानसरे आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा मुलगा हमीद दाभोलकर, मुलगी मुक्ता दाभोलकर या आरोपींच्या ‘नेक्स्ट टार्गेट’ असल्याचं तपास यंत्रणांच्या समोर आलंय. यामुळे तातडीन ‘स्टेट इंटेलिजन्स विभागा’कडून ‘एक्स’ दर्जाचं संरक्षण पुरवण्यात आलंय.

पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या डायरीमधे हमीद दाभोलकर, मेघा पानसरे यांची नावं नेक्स्ट टार्गेट म्हणून आढळल्याने एसआयडी विभाग खडबडून जागा झालाय. हमीद, मुक्ता आणि मेघा या तिघांच्या सुरक्षेसाठी स्पेशल प्रोटेक्शन युनिट (एसपीयू) विभागाचा एक-एक जवान २४ तास तैनात असणार आहे. तपास यंत्रणा सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय.

गौरी लंकेश हत्ये प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून काही डायऱ्या आणि साहित्य हस्तगत करण्यात आलं होतं. त्यामध्ये हमीद, मुक्त आणि मेघा यांचा उल्लेख ‘नेक्स्ट टार्गेट’ असा करण्यात आला होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत