मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत

खालापूर – समाधान दिसले

मागील आठवड्यात संततधार पावसाने कहर केला होता, या दरम्यान खोपोलीतील नाले ओसंडून वाहत असताना या नाल्यामध्ये क्रांतीनगर झोपडपट्टी मधील दोन लहान मुले वाहून गेली होती. या कुटुंबावर दुःखाचे डोंगर पडले या कुटुंबाला धीर देण्यासाठी खोपोली शिवसेना कार्यकर्त्यांनी भेट देऊन शासनाच्या भरपाईची वाट न पाहता शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रोख रक्कम कुटुंबाला देऊन सांत्वन केले या मदतीने तुमची मुले परत येणार नाहित पण या दुःखात आम्ही सहभागी असल्याचे सांगून धीर दिला.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे मात्र सध्या खोपोलीसह महाड, चिपळूण, पोलादपूर, खालापुरात अतिवृष्टीमुळे हाहाकार माजला आहे. अनेक जण या कुटुंबाना आधार देण्यासाठी पुढे येत असून खोपोली शहरात मागील आठवड्यात मुसळधार पावसामुळे क्रांतीनगर येथील नाल्यात हालचालीवर कुटुंबातील निल्लमा व तिचा छोटा भाऊ बाबू हे दोघे घरात कोणी नसताना खेळता खेळता या नाल्यात पडून वाहून गेले त्यांचा तीन दिवसानंतर मृत्यूदेह सावडल्याने या कुटुंबावर दुःखाचे डोंगर पडले 27 जुलै रोजी खोपोली शहरातील शिवसेना पक्षाच्या वतीने उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले आणि गरीब कुटुंबाला मदत म्हणून 30 हजार रुपये देऊन मदत केली.

यावेळी शहरप्रमुख सुनील पाटील, उपनगराध्यक्ष विनिता कांबळे औटी, नगरसेविका प्रमिला सूर्वे, माधवी रिठे महिला आघाडी संघटक प्रिया जाधव, शिळफाटा महिला आघाडी संघटक सुरेखा खेडकर, नगरसेवक अमोल जाधव, राजू गायकवाड, शिवसहकर सेनेचे संघटक हरीश काळे, शिवसेना नेते पंकज पाटील शिवसेना प्रवक्ते लक्ष्मण रीठे, विभाग प्रमुख विलास चाळके, प्रसिद्धीप्रमुख मुकुंद बेंबडे, चंदू फावडे, महिला आघाडीच्या सदस्या सारिका धोत्रे, सारिका सावंत, सुलोचना दाभाडे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत