मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप

खालापूर – समाधान दिसले

शिवसेना पक्षपमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवस वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना उपशहरप्रमुख अनिल सानप यांच्या पुढाकाराने सामाजिक बांधिलकी आपण काहीतरी समाजाचे देणे लागतो या उद्देशाने सध्या संपूर्ण रायगड जिल्ह्यात महापुराने थैमान घातले आहे त्यातच खोपोली शहरातील सिद्धार्थनगर येथील ५० पूरग्रस्त नागरिकांना त्यांच्या मातोश्री विमल सानप यांच्या हस्ते ब्लँकेट वाटप करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार जगन्नाथ ओव्हाळ, सामाजिक कार्यकर्ते भाजीवाले सलीम शेख, राजे प्रतिष्ठानचे शहराध्यक्ष निलेश मोडवे, बशीर पठाण, नामदेव गायकवाड, प्रकाश शेजवळ , अरविंद तूपसमिंदर, आयाज मौला शेख, विजय बोराडे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी पूरग्रस्त नागरिकांनी उपशहर प्रमुख अनिल सानप यांचे आभार मानले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत