मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खोपोलीतील रमाधाम वृध्दाश्रमास भेट

 खोपोली : विकास मिरगणे 

मुख्यमंत्री झाल्यांनतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच रमाधाम वृध्दाश्रमाला भेट दिली. यावेळी खास नागपूर वरून आणलेली संत्रा बर्फी देऊन त्यांनी जेष्ठ नागरिकांचे तोंड गोड केले. 

मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खोपोलीतील रमाधाम वृद्धाश्रमात आले. या वृद्धाश्रमाचे आणि ठाकरे परिवाराचे भावनिक नाते आहे. येथील कारभाराची त्यांच्या कुटुंबियांकडून जातीने चौकशी केली जाते. सध्या या ठिकाणी नवीन सुसज्ज इमारत्याचे बांधकाम सुरु आहे.  या नवीन इमारतीच्या बांधकामाची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. या कामावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाधान व्यक्त करीत आगामी काही दिवसात ह्या प्रशस्त आणि सुसज्ज इमारतीचे उद्घाटन करण्यात येऊन ती वृद्धांच्या सेवेत हजर होईल असे सूतोवाच केले.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खोपोली येथे यावेळी रमाधाम वृद्धाश्रमाचे अध्यक्ष चंदू मामा वैद्य, खासदार श्रीरंग बारणे, माजी मंत्री रवींद्र वायकर, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह जिल्हाधिकारी डॉक्टर विजय सूर्यवंशी, प्रांताधिकारी वैशाली परदेशी, तहसीलदार इरेश चप्पलवार यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत