मुख्यमंत्र्यांचा रमजानच्या सेहरीत सहभाग!

रमजाननिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा

मुंबई : रायगड माझा वृत्त 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी रात्री माहिम येथे पीर मखदूम चॅरिटेबल ट्रस्ट, हाजीअली दर्गाहच्यावतीने पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने आयोजित सेहरीच्या कार्यक्रमास उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. 

यावेळी पशुसंवर्धन व दुग्ध विकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आमदार अमिन पटेल, आमदार वारिस पठाण आदी उपस्थित होते. माहिम दर्गाहचे विश्वस्त सुहेल खंडवानी, इब्राहिम दरवेशी, डॅा. लांबे आदींनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे स्वागत केले. अॅड. रिझवान मर्चंट यांनी मुख्यमंत्र्यांना पवित्र कुराण शरीफ ग्रंथाची प्रत भेट दिली.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी  पवित्र अशा रमजान महिन्याचे महत्त्व नमूद करून उपवासाच्या माध्यमातून जोपासल्या जाणाऱ्या त्यागाची परंपरा, त्यातील शुद्ध भाव यातून बंधुता, समाजाप्रती समर्पणाची सदभावना वृद्धिंगत व्हाव्यात, अशा शुभेच्छा दिल्या. 

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लिजंडस ग्रुपचे सुहेल खंडवाणी, एम.फारुख घिवाला, अर्शद सय्यद, सय्यद रियाझ, असिफ दादरकर, तौरब दरवेशी, तन्वीर दरवेश यांचा सत्कार करण्यात आला. हाजी अराफत शेख, असिफ हबीब, खालिद बाबू कुरेशी, असिफ कुरेशी, अजमेर दर्गाहचे विश्वस्त जावेद पारेख यांच्यासह मुंबईतील विविध दर्गाह, मदरसे, मशिदींचे विश्वस्त आदींची उपस्थिती होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत