मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला विरोधकाकडून काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त

यवतमाळ: कल्पक वाईकर

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश 1 ऑगस्ट रोजी अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथून सुरु झाली होती. वर्धा भडारा गडचिरोली नागपूर चंद्रपूर वरून यवतमाळ जिल्ह्यात धडकल्या नंतर राळेगाव यवतमाळ येथील सभा आज आटपली.

राज्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड मतदार संघातील दारव्हा येथील सभा आटपवुन निघाल्यानंतर महाजनादेंश यात्रा दारव्हा येथुन कारंजा कडे जात असताना दारव्हा येथील विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना दारव्हा पोलीस स्टेशन येथे स्थानबद्ध केले असताना देखील पोलीस स्टेशन समोरून मुखमंत्र्यांची जनादेश यात्रा जात असताना  कार्यकर्त्यानी पोलीस स्टेशन आवारातून काळे झेंडे दाखवूंन मुखमंत्र्याचा निषेध नोंदविला. तर याआधी 5 तारखेला राळेगाव येथून महाजनादेश यात्रा निघाल्यानंतर बाभूळगाव येथील युवक काँग्रेस पदअधिकाऱ्या कडून कळंब येथे काळे झेंडे दाखवूं निषेध केला होता. त्यानंतर यवतमाळ मध्ये जनादेश यात्रा दाखल झाल्यानंतर प्रहार कार्यकर्त्यांकडून यवतमाळ शहरातील पोस्ट ऑफिस चौकात काळे झेंडे दाखवून मुख्यमंत्र्यांचे निषेध व्यक्त केला. यावेळी प्रहार चे जिल्हा प्रमुख तथा नगरसेवक यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज लांडगे यांनी मारहाण केल्याप्रकरणी जिल्ह्यात मोठेघमासान सुरु झाले आहे

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत