मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी कर्जतमध्ये महिलासाठी आरोग्य चिकीत्सा शिबिराचे आयोजन

कर्जत: भूषण प्रधान 

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नगरसेविका स्वामींनी मांजरेकर यांनी महिला आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन केले होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस भाजपच्या कर्जत शहर महिला मोर्चाने सामाजिक उपक्रमाने साजरा केला.

यानिमित्ताने आयोजित केलेल्या महिला चिकित्सा शिबिराचे तालुकाध्यक्ष पंढरीनाथ राऊत , उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल यांनी दीपप्रज्वलन करून उदघाटन केले. भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा कल्पना दास्ताने , बिनिता घुमरे , सरस्वती चौधरी , मृणाल खेडेकर, स्नेहा गोगटे , गायत्री परांजपे, शर्वरी कांबळे आदी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या डॉक्टर प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालयाच्या सहकार्याने हे शिबीर संपन्न झाले. डॉक्टर स्मिता सोनी, डॉक्टर ऋतुजा पाटील . डॉक्टर विदिया यादव डॉक्टर संजय पाटील हे या शिबिरात सहभागी झाले होते. कर्जत येथील ब्राम्हण सभा हॉल मध्ये नगरसेविका स्वामिनी मांजरेकर यांच्या पुढाकाराने या शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. रायगड

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत