मुख्यमंत्र्यांना ‘डाकू‘ म्‍हटल्‍याने मुख्याध्यापक निलंबीत

जबलपूर (मध्य प्रदेश) : रायगड माझा ऑनलाईन

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर टीका करणे एका मुख्याध्यापकाला चांगलेच महागात पडले आहे. मुख्यमंत्र्यांवर केलेल्‍या टीकेमुळे या मुख्याध्यापकाला निलंबीत करण्यात आले आहे. मुकेश तिवारी असे निलंबीत करण्यात आलेल्‍या मुख्याध्यापकाचे नाव आहे.

जबलपूर येथील एका सरकारी प्राथमिक शाळेत मुकेश तिवारी हे मुख्याध्यापक म्‍हणून काम करत आहेत. त्‍यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर टीका केलेला  व्हिडिओ सोशल मीडियावरुन व्हायरल झाला आहे. ‘‘१४ वर्षे भाजपचे सरकार होते त्‍यावेळी आम्‍हाला त्रास सहन करावा लागत होता. परंतु, आता तर काँग्रेसचे सरकार आले आहे. आता काय होतंय ते पहावे लागणर आहे. आमच्या समाजात अनेक अडचणी आहेत. माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान कसेही असले तरी ते आमचेच होते. परंतु, कमलनाथ यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायच्या ते तर डाकू आहेत.’’ असे वक्‍तव्य मुख्याध्यापक तिवारी यांनी केले आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्‍यानंतर काँग्रेस समर्थकांनी जबलपूर जिल्ह्याचे जिल्‍हाधिकारी छावी भारद्वाज यांची भेट घेउन मुकेश तिवारी यांना निलंबीत करण्याची मागणी केली. व्हिडिओची चौकशी केल्‍यानंतर तिवारी यांना निलंबीत करण्याचे जिल्‍हाधीकाऱ्यांनी आदेश दिले.

नुकत्याच झालेल्‍या विधानसभा निवडणुकीत १५ वर्षांनतर काँग्रेसने भाजपला पराभूत करुन आपले सरकार स्‍थापन केले आहे. यानंतर कमलनाथ यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत