मुख्याधिकारी म्हणतील तेव्हाच पाणीपुरवठा करणार

म्हसळा शहरात नगरपंचायत तर्फे पाणी टंचाईग्रस्त नागरिकांची थट्टा उडवणारा आदेश

म्हसळा : निकेश कोकचा

म्हसळा शहरात नगरपंचायत तर्फे नागरिकांना उन्हाळ्यात भेडसावणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी टॅकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र तुमच्या घरी पाण्याचा थेंबही येत नसेल तेव्हा तुम्हाला नगरपंचायत कडून पाणीपुरवठा हवा असल्यास प्रथम मुख्याधिकारी यांची परवानगी घ्यावी लागेल,मग तुमच्या नळाला पाणी येतो की नाही याचा सर्वे होणार आणि त्या नंतर तुम्हाला पाणीपुरवठा करण्यात येईल असा म्हसळा शहरातील नागरिकांची थट्टा उडवणारा आदेश सध्या म्हसळा नगरपंचायतने आपल्या कर्मचार्यांना दिला आहे.
म्हसळा शहरातील नागरिकांना सध्या भीषण पाणीटंचाई सामोरे जावे लागत असतानाच नगरपंचाय तर्फे टंचाईग्रस्त नागरिकांची थट्टा उडवणारा आदेश दिला आहे.या आदेशामध्ये जर तुमच्या घरी पाणी येत नसेल तर तुम्हाला टॅकर ने पाणीपुरवठा हवे असल्यास प्रथम मुख्याधिकारी यांची परवानगी घ्यावी लागणार.यानंतर त्या भागातील फिटर तुमच्या घरी पाणी येतो की नाही हे तपासून बघेल आणि अहवाल पुन्हा नगरपंचायला देईल या नंतर मुख्याधिकारी निर्णय घेतील की तुम्हाला पाणीपुरवठा करायचा की नाही अशी माहिती नगरपंचायत कर्मचारी फरान साने यांनी दिली आहे.नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा होणार की नाही या निर्णयासाठी किमान दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागत असल्याने पाणी अभावी एखाद्या नागरिकाचा जीव जाण्याची भीती वर्तवली जात आहे.या बाबत आमच्या प्रतिनिधीने प्र.मुख्याधिकारी अर्चना दिवे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
म्हसळा नगरपंचायतीसाठी सध्या श्रीवर्धनच्या मुख्याधिकारी यांची प्रभारी मुख्याधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.यामुळे त्या म्हसळा शहरात आठवड्यातील दोन दिवसच असतात.यामुळे नगरपंचायतीकडून  टॅकर पाणीपुरवठा व्हावा यासाठी नागरिकांना नगरपंचायत कार्यालयाच्या वारंवार फेर्या माराव्या लागत आहेत.
म्हसळा नगरपंचायतीला या दुष्काळामध्ये नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करता येत नसेल तर त्यांनी दोन महिन्याची पाणीपट्टी माफ करावी. : प्रसन्ना निजामपूरकर,शहरवासी 
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत