मुख्याध्यापकाने घेतली शिपायाकडून लाच

रायगड माझा ऑनलाईन । संभाजीनगर

सेवापट वेतन पडताळणी पथकाकडे पाठवून मंजूर करून घेतल्याने शिपायाकडून दीड हजारांची लाच घेणाऱ्या मुख्याध्यापकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज मंगळवारी दुपारी रंगेहाथ अटक केली. या Image may contain: shoesप्रकरणी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कन्नड येथील कैलास गोपीचंद आम्ले (५२) हे कन्नड कालीमठ येथील स्वामी प्रणवानंद सरस्वती हायस्कूलचे मुख्याध्यापक आहेत. त्यांच्याकडे असलेल्या शिपायाचे सेवापट वेतन पडताळणी पथकाकडे पाठवून तो मंजूर करून घेतल्याने मुख्याध्यापक कैलास आम्ले यांनी दीड हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

लाच देण्याची इच्छा नसल्याने शिपायाने संभाजीनगरातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती. उपअधीक्षक किशोर चौधरी यांच्या पथकाने तक्रारीची शहानिशा केली असता त्यात तथ्य आढळले. लाच मागत असल्याचे सिद्ध होताच पोलीस निरीक्षक सचिन गवळी यांच्या पथकाने दुपारी महाविद्यालय परिसरात सापळा रचला. मुख्याध्यापक कैलास आम्ले यांनी केबिनमध्ये दीड हजाराची लाच स्वीकारताच दबा धरून बसलेल्या अधिकाऱ्यांनी झडप मारून कैलास आम्ले यांना रंगेहाथ अटक केली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत