मुथूट फिनकॉर्पकडून स्वच्छतादुतांचा सत्कार..

कर्जत : भूषण प्रधान

मुथूट फिनकॉर्पतर्फे कर्जत नगरपरिषदेमधील स्वच्छतादूतांचा तसेच कोरोना योद्धांचा सत्कार ४ ऑक्टोबर रोजी मुथूट फिनकॉर्प कर्जत शाखेमध्ये झाला. कोरोनाकाळात आपल्या जीवाची, व कुटुंबाची पर्वा न करता कर्जत नगरपरिषदेचे स्वच्छतादूत म्हणून काम करीत होते. त्यांच्या या कामाची पोच पावती म्हणून मुथूट फिनकॉर्पचे शाखा प्रबंधक मच्छिंद्र हजारे तसेच पदाधिकारी केतन शिंदे, कांचन मराडे, सोनल शेलार, तसेच सुरक्षा रक्षक सखाराम आहिर यांच्या हस्ते कोरोना योध्ये विजय म्हसे, दिनेश काकडे, सुजित गायकवाड, राहुल गायकवाड, कांचन गायकवाड, महेंद्र सोनावणे, अनिल शिंदे, स्वप्निल सोनावणे, कुणाल शीतपुरे, राहुल जाधव यांचा सत्कार करण्यात आला. समाजसेवक माजी केंद्र प्रमुख पी.यू.मोरे यांनी समाजातील स्वच्छता दूतांविषयी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी ओम साई संस्थेचे अध्यक्ष भाऊ बैलमारे, पत्रकार भूषण प्रधान, राजेश ठाणगे, सतीश कोकणे आदींसह नागरिक उपस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत