मुदखेडला सहा शहीद जवानांनी अवघ्या दहा दिवसापुर्वी प्रशिक्षण घेतले होते

नांदेड : कश्मिरच्या पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांपैकी 6 जवानांनी नांदेडजवळच्या मुदखेड इथल्या सीआरपीएफ प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतलेले होते ,अशी माहिती या प्रशिक्षण केंद्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक राकेश कुमार यादव यांनी दिली .

 

जीवाला चटका लावणारी घटना असल्याचे सांगत अवघ्या 10 दिवसांपूर्वी हे सहा जवान मुदखेड च्या कँम्पमध्ये प्रशिक्षण घेऊन जम्मू कश्मीर येथे रवाना झाले होते. या प्रशिक्षण केंद्रातून बाहेर पडलेले आणि या हल्ल्यात शहीद झालेले जी.सुब्रमण्यम (82 बटालिअन),तमिळनाडूगुरु एच (82 बटालिअन),कर्नाटकहेमराज मीणा (61 बटालिअन),कोटाप्रसन्न साहू (61 बटालिअन),ओडीशारतन कुमार ठाकूर (ग्रुप सेंटर,काठगोदाम),बिहारअश्विनी काओची (35 बटालिअन),मध्य प्रदेशहे सहा जवान प्रशिक्षण पुर्ण करुन सिमेवर लढण्यासाठी गेले . मात्र, दहशतवाद्यांच्या भ्याड हल्यात हे जवान शहीद झाले. शहीद जवानां सोबत प्रशिक्षण घेतलेल्या सहकाऱ्यांनी जशास तसे उत्तर देऊ अश्या भावना व्यक्त केल्या. मुदखेड सीआरपीएफ कँम्पकडून शहीद जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली. 
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत