मुरबाड शहरातील शिवसेना शाखा कार्यालय तोडण्याची कारवाई दुसऱ्या दिवशी सुद्धा टळली

मुरबाड : रायगड माझा

मुरबाड शहरातील शिवाजी चौकात बांधलेल्या शिवसेना शाखेचे बांधकाम तोडण्याची कारवाई लांबणीवर पडल्याने मुरबाड मध्ये प्रशासन विरुद्ध शिवसैनिक असा संघर्ष टळला शिवसेना शाखेचे बांधकाम तोडू नये म्हणून भिवंडीचे आमदार शांताराम मोरे शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील बुधवारी  मुरबाड येथे ठाण मांडून बसले होते

मुरबाड शहर शिवसेना प्रमुख राम दुधाळे  यानी  छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुरबाड शिवसेना  शहर शाखा कार्यालय बांधले आहे या कार्यालयाच्या बांधकामावर कर आकारणी करणे साठी त्यांनी मुरबाड नगर पंचायतीला पत्र दिले होते परंतु नगर पंचायतीने हे बांधकाम 30 दिवसाच्या आत तोडावे अशी नोटीस बजावली आहे.हे बांधकाम तोडण्यासाठी नगर पंचायतीने मंगळवारी सकाळी जेसीबी मशीन व कर्मचारी नेमले तसेच पोलीस बंदोबस्त सुद्धा मागवला होता सर्व तयारी सुरू असताना शिवसैनिक कैलास तेलवणे सोबत रॉकेलची बाटली घेऊन कार्यालयाजवळ बसले व शाखेचे बांधकाम तोडल्यास आत्मदहन करण्याचा ईशारा दिला होता परंतु सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास अचानक पोलीस बंदोबस्त पडघा व कुळगाव येथे आवश्यक असल्याचा संदेश आल्याने पोलीस निघून गेले व नगर पंचायतीचे कर्मचारी सुद्धा परत गेले होते

आज बुधवारी सकाळी नगर पंचायतीने पुन्हा शिवसेना शाखेचे बांधकाम तोडण्याची तयारी केली दंगल नियंत्रण पथकासह पोलीस बंदोबस्त आला पण शिवसैनिकांनी अगोदर पूर्वीची अनधिकृत  बांधकामे  तोडा नंतर शाखा तोडा अशी भूमिका घेतली .
पोलिसांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी बैठक घेतली पोलीस निरीक्षक अजय वसावे याना आमदार शांताराम मोरे, शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी बांधकाम तोडू देणार नाही अशी भूमिका घेतल्याने दुपारी तहसीलदार कार्यालयात तहसीलदार सचिन चौधर यांनी बैठक बोलावली त्यामध्ये नगराध्यक्ष मोहन सासे, उपनगराध्यक्ष नारायण गोंधळी यांनी भाग घेतला शिवसेना शाखेसाठी पर्यायी जागा मिळाल्या नंतर बांधकाम तोडण्याचे ठरले व संघर्ष टळला

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत