मुरुड तालुक्यातील कोर्लई समुद्रामध्ये कोस्टगार्डने दोन बोटी पकडल्या

गोवा राज्यातील दोन बोटी मुरूड तालुक्यातील कोर्लई समुद्रात भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी दोन पर्ससीन नौकां पकडल्या आहेत.

अमूलकुमार जैन,मुरूड जंजिरा

कोर्लई समुद्रात पकडलेल्या बोटी या गोवा राज्यातील असून बोनी सिल्वा व श सबस्तीव डिसिल्वा यांच्या मालकीच्या अनुक्रमे सिल्वा एन सन्स IND-GA-01- MM- 500 व आर सिल्वा अँड सन्स IND-GA-01-MM- 2691 या क्रमांकाच्या आहेत. ह्या बोटी मासेमारी करण्यासाठी आल्या होत्या.भर समुद्रात तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली.

त्या बंद पडलेल्या बोटीला टोइंग करून नेण्यासाठी दुसरी बोट कोर्लई येथे दाखल झाली. या बोटीवर एलईडी फिशिंगसाठी वापरण्यात येणारे लाइट होते. एलईडी लाइट फिशिंग बंद असल्याने या बोटीला कोस्टगार्डने अडवले त्यांची चौकशी केली .आणि त्यांना कोस्टगार्डने बोटीतील कर्मचाऱ्यांना मुरुड पोलिसांच्या स्वाधीन मुरूड पोलीस यांच्या स्वाधीन करण्यात आले.
मुरूड तहसीलदार उमेश पाटील यांनी या दोन्ही नौकांमध्ये असलेल्या मासळी लिलाव रक्कम रु,29900/-दंडाची रक्कम- 149500/-असे एकूण महसूल रु.179400/- जमा करण्यात आले आहे.
या बोटी घातपात घडवण्यासाठी आल्याच्या अफवा पसरल्या होत्या. या वृत्ताने या परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.परंतु यातील एक बोट मासेमारी करण्यासाठी येथे आली होती. हे समजताच सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
गोवा राज्यातील बोनी सिल्वा व सबस्तीव डिसिल्वा यांच्या मालकीच्या अनुक्रमे सिल्वा एन सन्स (IND-GA-01- MM- 500) व आर सिल्वा अँड सन्स (IND-GA-01-MM- 2691) या दोन पर्ससीन नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 अंतर्गत कलम 07, 15, 17 अंतर्गत दिनांक 26/10/2018 रोजी कारवाई करण्यात आली, संबंधित दोन्ही नौकांच्या मासळीचा लिलाव करण्यात आला असून मुरुड तहसीलदार उमेश पाटील यांनी संबंधित नौकामालकाना मासळीच्या रक्कमेच्या पाचपट दंड ठोठावला,त्यानंतर खलाशी ओळ्खपरेड व फोन तपासणी करिता करीता दोन्ही नौका पोलीस विभागाच्या ताब्यात दिलेल्या आहेत, सदर कारवाई करतेवेळी त्यांना राऊत मत्स्यक्षेत्र निरीक्षक मुरूड यांनी मोलाची मदत केली.अशी अपेक्षामाहिती रायगडचे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसायअभयसिंह शिंदे इनामदार यांनी दिली.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत