मुरूड आगारातील नऊ कामगार निलंबित

मुरुड : अमूलकुमार जैन

पगारवाढीसाठी एसटी कर्मचाऱयांनी पुकारलेल्या संपात सहभागी होणे मुरूड आगारातील नऊ कर्मचाऱ्यांना महागात पडले आहे. संपात सहभागी झाल्याने त्यांना बडतर्फीच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे.

वेतनढीसाठी एसटी कर्मचाऱयांनी ८ आणि ९ जून रोजी संप पुकारला होता. उन्हाळय़ाची सुट्टी संपवून गावावरून मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांना या संपाचा फटका बसला होता. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी हस्तक्षेप केल्यानंतर कर्मचाऱयांनी हा संप मागे घेतला होता. कर्मचारी विनापरवानगी कामावर गैरहजर राहिल्यामुळे महामंडळाचा महसूल बुडाला, प्रवाशांची गैरसोय झाली आणि महामंडळाची प्रतिमा जनमानसात मलिन झाल्याचा ठपका ठेवून त्यांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत