मुलगा हवा म्हणून ८३ वर्षांच्या म्हाताऱ्याने केले ३० वर्षांच्या महिलेशी लग्न

रायगड माझा ऑनलाईन । जयपूर

No automatic alt text available.

राजस्थानमधील करौली तालुक्यातील एका ८३ वर्षाच्या म्हाताऱ्याने चक्क तीस वर्षाच्या तरुणीसोबत धुमधडाक्यात लग्न केल्याचे समोर आले आहे. संपत्तीला वारस मिळावा म्हणून या वयात त्याने लग्न केले आहे. नव्या बायकोकडून आपल्याला मुलगा होईल व त्यातून संपत्तीला वारसा मिळेल, अशी त्याला आशा आहे.

करौलीमधील सम्रडा गावात राहणाऱ्या सुक्रम भैरवा यांचे साठ वर्षापूर्वी त्यांची पत्नी बट्टो यांच्याशी लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा व दोन मुली आहेत. त्यांच्या दोन्ही मुलींची लग्न झालेली आहेत. तर त्यांच्या मुलाचा वीस वर्षापूर्वी एका अपघातात मृत्यू झालाय. भैरवा यांची सम्राडा येथे भरपूर संपत्ती असून दिल्लीतही त्यांचे अनेक प्लॉट्स आहेत. मात्र आपल्यानंतर या संपत्तीला वारस नसल्याची सल त्यांच्या मनाला टोचत होती. त्यामुळे आपल्याला मुलगा झाला तर आपल्या संपत्तीला वारस मिळेल असा विचार त्यांच्या डोक्यात आला.

त्यासाठी त्यांची पत्नी बट्टो यांनी त्यांना दुसरे लग्न करण्यास सांगितले. त्यांच्या पत्नीनेच त्यांच्यासाठी शेजारच्या गावातील एका ३० वर्षाच्या तरुणीची निवड केली. गेल्या आठवड्यात गावात या दोघांचे अगदी धुमधडाक्यात लग्न पार पडले आहे. या ८३ वर्षाच्या नवरदेवाचे लग्न पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातून देखील अनेकजण आले होते.

घोड्यावरून वाजत गाजत वरात काढून नंतर संपूर्ण विधीवत त्यांचे लग्न पार पडले आहे.

आमच्या नावावर बरीच संपत्ती आहे. आमच्या दोन्ही मुली लग्न करून त्यांची घरी सुखाने नांदत आहेत. त्यामुळे आमच्या संपत्तीला वारस कुणीही राहिलेला नाही.

फक्त आणि फक्त मुलगा हवा म्हणून मी दुसऱ्या लग्नासाठी तयार झालो आहे. माझी दुसरी बायकोच मला मुलगा देऊ शकेल, असे भैरवा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत