मुलगी कोरोनाने मेली असती तर…! हाथरसच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांचं अजब वक्तव्य |

नवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त

हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना धमकावत असल्याचं दिसत आहे.पीडितेच्या वहिनीने जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी माझ्या सासऱ्यांना तुमची मुलगी कोरोनाने मेली असती तर तुम्हाला नुकसानभरपाई मिळाली असती का?, असा प्रश्न विचारल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. हे प्रकरण दाबण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या कुटुंबावर दबाव टाकत असल्याचे या व्हिडीओमधून दिसत आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत