मुलांपेक्षा नातवंडांकडे जेष्ठ नागरिकांनी लक्ष केंद्रित करावे: महेंद्र दळवी

मुरूड अलिबाग : अमूलकुमार जैन


मुले ही कामात व्यस्त असल्याने त्यांचे आई वडील यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र जेष्ठ नागरिक यांनी याची खंत न बाळगता त्यांनी आपले सर्व लक्ष नातवंडांकडे केंद्रित करावे असे प्रतिपादन शिवसेने माजी जिल्हाप्रमुख तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते महेंद्र दळवी यांनी मुरूड तालुक्यातील बोर्ली येथे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अजय(राजा)सोडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जेष्ठ नागरिक सत्कार समारंभात केले.

यावेळी व्यासपीठावर बोर्ली सरपंच नौशाद दळवी,अजय सोडेकर, मांडला सरपंच सुचिता पालवणकर,बोर्ली ग्राम पंचायत सदस्या नम्रता शिंदे,जगीता कोटकर,माजी सरपंच इम्तियाज दळवी, माजी तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत चोगले,पंचकृम समाज अध्यक्ष प्रकाश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

नौशाद दळवी यांनी त्यांचे मित्र अजय सोडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त जेष्ठ नागरिक यांच्याशी सवांद साधण्यासाठी सत्काराचे आयोजन केले आहे हे कौतुकास्पद कार्य आहे.अजय सोडेकर आणि नौशाद दळवी याची मैत्री ही हिंदू मुस्लिम समाजाच्या ऐक्याचे प्रतीक आहे. ज्येष्ठ व्यक्तींची सेवा करण्याची भारतीय परंपरा होती, आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांना एकटेपणाला सामोरं जावं लागतं आहे. वाढत्या वयाबरोबर नव्या नव्या समस्या उद्भवताहेत, त्यामुळे ज्येष्ठांबद्दल समाजाला आदरभाव आणि त्याचप्रमाणे सशक्त, सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्याची नितांत गरज आहे.आपली नातवंडे कशी असावीत, त्यांना कोणते संस्कार द्यावेत, त्यांना काय हवं नी काय नको, याकरिता आजी-आजोबा प्रयत्नशील असतात, त्यासाठी ते झटत असतात.आयुष्यभर धकाधकीचे आयुष्य जगल्यानंतर उत्तरार्ध आनंदात आणि निवांत जावा, अशी त्यांची रास्त अपेक्षा आहे. वाढत्या प्रदूषणाचाही त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यांना फिरण्यासाठी निवांत जागा मिळावी, यासाठी आता पुढाकार घेण्याची गरज आहे. वस्ती-वस्तीमध्ये विरंगुळा सेंटर असावेत, बगीचे असावेत. अनेक ज्येष्ठ नागरिकांना कुटुंबाचा आधार नसतो. मी जेव्हा घाटमाथ्यावर फिरत असताना तेथील भरणारे आठवडा बाजार पाहून ह्या प्रकारचा आठवडा बाजार थळ ग्राम पंचायत हद्दीत बांधण्याची संकल्पना मनात आली.त्यानुसार ग्राम पंचायत हद्दीत जिल्ह्यातील सर्वात मोठा आठवडा बाजारबांधला आहे.त्या आठवडा बाजार बांधण्यासाठी ग्रामपंचायत निधीतील एकही पैशाचा वापर न करता एका राष्ट्रीय बँकेच्या माध्यमातून बांधला आहे.ह्या बाजारातुन मिळणाऱ्या उत्पन्नातील पन्नास टक्के निधी जेष्ठ नागरिक संघाला तर पन्नास टक्के निधी ग्राम पंचायत ला दिले जाते. या आठवडा बाजाराची देखभाल हे जेष्ठ नागरिक संघ पहात आहे.या आठवडा बाजाराच्या मिळणाऱ्या उत्पन्नातुन वर्षांतुन दोन वेळा सर्व जेष्ठ नागरिक एकत्र येवून संमेलन भरवीत असतात.त्याचप्रमाणे बोर्ली सरपंच नौशाद दळवी यांनी जेष्ठ नागरिकांसाठी आठवडा बाजाराची संकल्पना राबवावी आणि तो जेष्ठ नागरिकांना चालविण्यास द्यावा.अशी सूचना सुद्धा त्यांनी केली.सुख दुःख हे नेहमी येत असतात. त्याचा विचार न करता उद्याचा विचार करावा.मुले आणि आई वडील यांच्यातील जो संवाद थांबला आहे त्याला एकमेव कारण म्हणजे पैसा हा आहे.पैसा हा आजच्या युगात सर्वात महत्त्वाचा ठरत आहे.कारण पैशामुळे सर्व सुखसोयी उपलब्ध होऊ शकतात असा कारणाने सर्व पैशाच्या मागेधावू लागले आहेत.वृद्धांनी सुद्धां येणारा दिवस हा आनंदात जगण्याचा प्रयत्न करावा कारण प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी आला आहे. असे दळवी यांनी यावेळी सांगितले

बोर्ली सरपंच यांनी सांगितले की,जेष्ठ नागरिक यांच्यासोबत सहसा कोणी बोलत नाही.ते त्यांचा वेळ हे एकांतात घालवीत असल्याने त्याना आयुष्याचा कंटाळा येत असतो.त्यामुले त्यांची चिडचिड वाढत असते.मुले ही व्यवसाय,नोकरीनिमित्त दिवसभर बाहेर असतात. दिवसातून किंवा आठवड्यातून तासभर बोलण्याची सवडही त्यांना मिळत नाही.अशी गत माझ्या सहित अनेकांची आहे.म्हणून ग्राम पंचायत हद्दीतील सर्व जेष्ठ मंडळींना एकत्र आणून त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्यासाठी काही तरी करण्याचा प्रयत्न आहे.जेष्ठ नागरिकांसाठी मेडिक्लेम पॉलिसी काढण्याचा विचार आहे.कारण त्यांच्या औषध उपचारासाठी कोणापुढे हात पसरण्याची वेळ येऊ नये.मी ज्यादिवशी सरपंच म्हणून खुर्चीत बसलो त्यादिवसापासून माझे ज्यांच्याशी असणारे विरोध संपला आहे.प्रत्येक नागरिक हा माझा आहे.त्यांचे कोणतेही समस्या असेल तर त्यांनी हक्काचा माणूस म्हणून सांगावे.त्यांची ती समस्या सोडविण्यासाठी मुलगा ,भाऊ यांनात्याने प्रयत्न करेन असा विश्वास व्यक्त केले.पंचायत हा माझा व्यवसाय नसून समाजकार्य आहे.बोर्ली ग्रामपंचायत कार्यालय हे सुसज्ज बांधून त्या ठिकाणी गावात विखुरलेले असलेले शासकीय कार्यालये एकत्र आणण्याचा मानस आहे.जेष्ठ नागरिकांची एक संघटना तयार करून त्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले जाईल. ते एकत्र आल्याने त्यांना त्यांचे मन एकमेकाजवळ मनमोकळ्याने सवांद साधता येईल.असे दळवी यांनी सांगितले.

बोर्ली येथील अयुब नाईक(गुल्लू) यांनी सांगितले की,बोर्ली स्थानकावर जो मच्छिबाजार भरत आहे.त्यामुले भविष्यात दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.तरी तो बाजार तेथून हलविण्यात यावा.त्याचप्रमाणे बोर्ली ग्रामपंचायत हद्दीत पाणी पुरवठा हा सुरळीत करण्यात यावा.मुख्य जलवाहिनीवरून देण्यात आलेली जोडणी ही तोडण्यात यावी अशी मागणी सरपंच नौशाद दळवी यांच्याकडे केली आहे.

यावेळी चंद्रकांत चोगले,यासिन दळवी,अजय सोडेकर यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी बोर्ली ग्राम पंचायत हद्दीतील जवळपास अडीचशे जेष्ठ नागरिकांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ,सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला .

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुचिता सोडेकर, अजय पवार,बोर्ली शाखाप्रमुख भारत मोती,युवा सेनाध्यक्ष संदेश शिर्के,अमूलकुमार भलगट, विलास पालवणकर,अनंत नरहरी, भारत आग्रवकर,हरिश्चंद्र भोसले,चेतन भोईर मिलिंद कोपरदर यांनी मेहनत घेतली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत