मुलींची राज्य अजिंक्‍यपद सॉफ्टबॉल स्पर्धा शनिवारपासून

ज्युनियर गटातील शारदा – गजानन चषक स्पर्धेत 25 संघांचा सहभाग 

पुणे: रायगड माझा

महाराष्ट्र सॉफ्टबॉल संघटनेच्या मान्यतेने पुणे जिल्हा सॉफ्टबॉल संघटना व आबेदा इनामदार कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्‍त विद्यमाने मुलींच्या ज्युनियर गटाच्या शारदा – गजानन चषक राज्य अजिंक्‍यपद स्पर्धेचे आयोजन आझम कॅम्पस येथे 12 ते 14 मे दरम्यान करण्यात आले आहे, अशी माहिती पुणे जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव गजानन पंडित यांनी दिली. यावेळी पुणे जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे अध्यक्ष अण्णा थोरात उपस्थित होते.

या स्पर्धेत पुणे शहर, पुणे जिल्हा, पिंपरी-चिंचवड, मुंबई, जळगांव, नागपूर, कोल्हापूर, अमरावती, सांगली, लातूर, बीड, औरंगाबाद असे 25 संघ सहभागी होत आहेत. सुमारे 450 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. विजेत्या, उपविजेत्या व तिसऱ्या क्रमांक मिळविणाऱ्या संघाला चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. याबरोबरीने बेस्ट बॅटर, बेस्ट पिचर व बेस्ट कॅचर अशी तीन वैयक्‍तिक बक्षिसे देखील देण्यात येणार आहेत.

स्पर्धेचे उद्‌घाटन शनिवार, दि. 12 मे रोजी सकाळी 11.30 वाजता सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी महापौर मुक्‍ता टिळक, आमदार जगदीश मुळीक, एमसीई सोसायटीच्या उपाध्यक्षा आबेदा इनामदार, तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती अण्णा थोरात यांनी दिली.


शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत