मुलींना ही जगण्याचा हक्क आहे : न्यायाधीस सुभाष फुले

रोहे : महादेव सरसंबे

मुलींचे प्रमाण घटत आहे.त्यामुळे समाजिक समस्या निर्माण झाली आहे.यासाठी समाज प्रबोधनाची गरज आहे.समाजात मुलींना जगण्याचा हक्क आहे.समाजात त्यांचा आदर निर्माण करण्याची गरज आहे.त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी या उध्देशाने लेक वाचवा लेक शिकवा हे घोष वाक्य घेत तालुक्यातील रोहा, नागोठणे व कोलाड या तीन विभागात चित्रकला स्पर्धा घेण्यात आली असुन 26 शाळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेसाठी वकीलांनी व शिक्षकांनी मार्गदर्शन व सहकार्य केल्याचे प्रतिपादन रोहा दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीस सुभाष फुले यांनी केले.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबर्इ यांनी दिलेल्या निर्दशानुसार किमान सामार्इक कार्यक्रमांतर्गत लेक वाचवा लेक शिकवा या विषयावर रोहा तालुक्यात 23 जुलै 2018 ते 25 जुलै 2018 या दरम्यान जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड अलिबाग यांच्या वतीने रोहा तालुक्यातील शाळेत लेक वाचवा लेक शिकवा या घोष वाक्याच्या अनुसारून चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आले होते.त्या स्पर्धेच्या बक्षिस वितरण कार्यक्रमा प्रसंगी मेहेंदळे हायस्कुल येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना न्यायाधीस सुभाष फुले बोलत होते.

या वेळी न्यायाधीस चारूदत्त शिपकुले, सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील गायकवाड, ज्येष्ठ वकिल अ‍ॅड नानासाहेब देशमुख, अ‍ॅड सुनील सानप, अ‍ॅड आर.पी.सावंत, अ‍ॅड मनोजकुमार शिंदे, गटशिक्षण अधिकारी सादुराम बांगर, मुख्याध्यापक रमेश मोसे, अ‍ॅड हफीज, अ‍ॅड दिनेश वर्मा, अ‍ॅड एम.के.शिंदे, अ‍ॅड अजित दांडेकर, अ‍ॅड कविता मोरे, अ‍ॅड प्रणाली पाटणे, अ‍ॅड दर्शना देशमुख, डि.जे शेलार, भरत पालकर, नारायण पानसरे, विनोद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी गट शिक्षण अधिकारी सादुराम बांगर यांनी आपल्या प्रास्ताविकात चांगली स्पर्धा आता पर्यंत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड अलिबाग यांच्या वतीने घेण्यात आली असुन ही स्पर्धा 23, 24 व 25 जुलै दरम्यान घेण्यात आली असुन या स्पर्धेत 592 विद्यार्थी सहभागी झाले होते.

या स्पर्धे दरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन नागोठणे विभागात विधीज्ञ पी.जी.दाभाडे, अ‍ॅड.डी.टी.पडवळ, अ‍ॅड व्ही.जी.सावंत, अ‍ॅड सी.सी.कामथे व अ‍ॅड पी.डी.गाडे, रोहा विभागात तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष सुभाष ल.फुले, रोहा क.स्तर सह दिवाणी न्यायाधीस चारूदत्त उध्दव शिपफुले, गटविकास अधिकारी प्रदिप पवार, सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील गायकवाड, गटशिक्षण अधिकारी सादुराम बांगारे, विधीज्ञ पी.पी.जोशी, डी.एम.वर्मा, एम.वाय घायले, कोलाड विभागात विधीज्ञ एम.एम.पाटील, पी.पी.जोशी, विधीज्ञ एस.ए.हफीज, एस.पी.सानप, डी.डी.देशमुख, एम.एस.म्हैसदुने यांनी केले. या स्पर्धेचे परीक्षण रविंद्र कोष्टी व गणेश राणे यांनी केले.

या स्पर्धेत 1 ते 7 वी पर्यंत प्रथम क्रमांक मैत्रेय सं.बांधनकर पेट्रोकेमिकल विद्यालय नागोठणे, व्दितीय क्रमांक नाजुका मं.पडवळ को.ए.सो.मेहेंदळे हायस्कुल रोहा, तृतीय क्रमांक अंशिका मिश्रा जिंदाल माऊंट लिटेरा झी स्कुल सुकेळी, उत्तेजणार्थ शंतनु एस.गुरव के.इ.एस.इंग्लीस मेडिअम स्कुल रोहा व श्रावणी संतोष बामणे के.र्इ.एस.इंग्लीश मेडिअम स्कुल रोहा यांना देण्यात आले.तर 8 ते 10 गटात प्रथम क्रमांक सानिका संतोष कहाने के.इ.एस.व्ही.पी.टी.इंग्लीस मेडीअम स्कुल रोहा, व्दितीय क्रमांक पियांशू मांडळ जिंदाल माऊट लिटेरा झी स्कुल सुकोळी रोहा, तृतीय क्रमांक ऋुतुजा भरत पाडूळे को.ए.सो.मेहेंदळे हायस्कुल रोहा, उत्तेजनार्थ दीप भरत वरखले श्री.रा.ग.पोटफोडे ( मास्तर) विद्यालय खांब रायगड रोहा व रश्मी रविंद्र मोहीते रामभाऊ महादेव वागळे विद्यालय धामणसर्इ यांना देण्यात आले.या विजेत्या स्पर्धकांना दिवाणी न्यायालय रोहा व विधी संघटना रोहा यांच्या वतीने पारीतोषिक देण्यात आले असुन या मध्ये प्रथम क्रमांक 1001 रूपये व चषक, व्दितीय क्रमांक 701 व चषक, तृतीय क्रमांक 501 व चषक उत्तेजणार्थ 301 व चषक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विस्तार अधिकारी विनोद पाटील व अभार नारायण पानसरे यांनी मानले.या कार्यक्रमास मोठया प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.़
बातमी सोबत फोटो पाठवित आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत