मुलींनो आपल्या बापाला ताठ मानेने चालता याल पाहिजे अशी वागणुक ठेवा : ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख- इंदोरीकर

खोपोली : समाधान दिसले

माणकीवली येथे शिवजयंती उत्सवात ह.भ.प.निवृत्ती देशमुख यांची किर्तनरुपी सेवा ऐकण्यासाठी अलोट गर्दी

सर्वत्र ठिकाणी शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असुन खालापूर तालुक्यातील ग्रामीण माणकीवली गावात सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती, ग्रामस्थ मंडळ व जय भवानी प्रतिष्ठान माणकीवली यांच्या संयुक्त विदयमाने शिवजयंती उत्सव दोन दिवस मोठ्या दिखामात साजरा करण्यात आला, तर या उत्सवात समाजप्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख – इंदोरीकर यांनी आपल्या किर्तन रुपी सेवेतून आपले मत मांडताना मुलींनो आपल्या बापाने गल्लीबोल्लातून ताठ मानेने चालता याल पाहीजे अशी वागणूक ठेवा, असे केल्यास तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचे नाव समाज चांगले राहिल, असे मत समाजप्रबोधनकार इंदोरीकर यांनी मांडले.

शिवजयंती म्हटली की, सर्व ठिकाणी मोठ्या उत्साहाने थाटामाटात साजरी केली. तसेच शिवजयंती निमित्ताने समाज हिताचे व समाज प्रबोधनाचे कार्यक्रम सर्वत्र ठिकाणी संपन्न झाले असुन शिवकालीन इतिहास जागा व्हावा या उद्देशाने विविध शिवकालीन इतिहासावर कार्यक्रम पार पडले. तसेच खालापूर तालुक्यात माणकीवली गावात सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती, माणकीवली ग्रामस्थ व जय भवानी प्रतिष्ठान यांच्या विदयमाने मोठ्या जल्लोषात शिवजयंती उत्सव पार पडला. यामध्ये शिवप्रतिमेचे पुजन, सत्यनारायण महापुजा, शिवप्रतिमेची ढोल ताश्याच्या गजरात भव्य मिरवणूक, भजन, भारुड, गवळणी, अभंग, पोवाडे, गोंधळ आदि विविध कार्यक्रमासह ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख – इंदोरीकर याचे सुवाश्र हरिकिर्तन पार पडल्याने माणकिवली गाव शिवकालीन इतिहासात न्हावुन गेले होते. तर आपल्या किर्तन रुपी सेवेतुन पुढे बोलताना समाजप्रबोधन ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख – इंदोरीकर असे म्हणाले की, मुलगी हीच खरी बापाची इज्जत असुन तिच्या सुखासाठी तो आयुष्यभर काबाडकष्ट करीत असतो, म्हणून मुलींनी बापाच्या इज्जतली गाळबोट लागणार नाही असे कृत्य करू नये. तसेच गरीबाला केली मदत कधीच वाया जात नाही आणि मदतीची ज्यांना गरज आहे त्यांना खऱ्या मनाने मदत केल्याने जीवनात वेगळाच आनंद तुम्हाला मिळेल. तर माझा किर्तन महाराज म्हणून न ऐकता एक मित्र व मुलगा म्हणून ऐका असे आवाहन सर्वाना इंदोरीकर महाराजांनी केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत