मुलीच्या वाढदिवसासाठी आलेल्या जवानाची माओवाद्यांनी केली हत्या

पाटणा : रायगड माझा वृत्त

बिहारच्या जमुई जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सुट्टीवर आलेल्या एका जवानाची माओवाद्यांनी निर्घृणपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे. सिकंदर यादव असं या जवानाचं नाव असून हा जवान बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील सशस्त्र सीमा दलाच्या 48 व्या बटालियनमध्ये कार्यरत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, सिकंदर आणि त्यांचे कुटुंबीय मुलीचा चौथा वाढदिवस साजरा करत होते. त्याचवेळी जवानाला शोधत दोन माओवादी पोलिसांच्या गणवेशात त्यांच्या घरी आले. त्यांनी सिकंदरला कामासाठी घराबाहेर बोलावले. सिकंदर बाहेर येताच त्यांच्या घराबाहेर आलेल्या 20 माओवाद्यांनी त्याला पकडले व बंदुकीचा धाक दाखवून फरफटत नेले. सिकंदरच्या घरापासून थोड्या अंतरावर त्याची गोळी घालून हत्या करण्यात आली.

bihar maoists killed ssb jawan on in front of his house celebrating daughter birthday | मुलीच्या वाढदिवसासाठी आलेल्या जवानाची माओवाद्यांनी केली हत्या

गावकऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, माओवाद्यांमध्ये काही महिलांही सहभागी होत्या. तसेच पोलिसांचा खबऱ्या असल्याने तुला त्याची ही शिक्षा करण्यात येत असल्याचं माओवादी म्हणत होते. सिकंदरची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह रस्त्यावर सोडून माओवादी जंगलात पळून गेल्याचेही काही गावकऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून माओवाद्यांच्या शोधासाठी छापेमारी सुरू केली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत