मुलुंडमध्ये इमारतीला लागलेल्या आगीत तीन जखमी

 मुंबई : रायगड माझा ऑनलाईन 

bike-fire-pic

मुलुंड गवाणपाडा मार्गावरील डेस्टिनी हाईट्स या इमारतीला आज सकाळी 10.30 वाजता लागलेल्या आगीत तीन जण जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.

डेस्टीनी हाईट्स ही 22 मजली इमारत आहे. यामध्ये मीटरबॉक्समध्ये शॉर्टसर्किटमुळे अचानक आगीची ठिणगी पडली. त्यामुळे आगीचा भडका उडाला. अचानक लागलेल्या आगीमुळे इमारतीतील रहिवाशांमध्ये घबराट पसरली. त्यामुळे इमारत तत्काळ रिकामी करण्यात आली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले. सुमारे तासाभरानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. जखमींमधील एक पुरुष आणि एका महिलेवर फोर्टिस रुग्णालयात तर एका महिलेवर वीर सावरकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत