‘मुळशी पॅटर्न’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : रायगड माझा वृत्त 

"मुळशी पॅटर्न' चित्रपटात पुनीत बालन, महेश मांजरेकर व प्रवीण तरडे.

पुनीत बालन एंटरटेन्मेंट प्रा. लि. निर्मित आणि प्रवीण विठ्ठल तरडेलिखित, दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ हा मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

या चित्रपटात मोहन जोशी, महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, मालविका गायकवाड, सविता मालपेकर, सुरेश विश्‍वकर्मा, क्षितिज दाते, सुनील अभ्यंकर, ओम भुतकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. प्रत्येकाने पाहावा अशा या चित्रपटाने बॉक्‍स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरू केली आहे.

पुण्यातील नामवंत रिअल इस्टेट समूहांपैकी एक असणाऱ्या एस. बालन समूहाचे व्यवस्थापकीय संचालक पुनीत बालन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. गेल्या २५ वर्षांपासून रिअल इस्टेट क्षेत्राचा वारसा असणाऱ्या पुनीत बालन यांनी नेहमीच शाश्‍वत सामाजिक उपक्रमांना सहयोग दिला आहे. त्याशिवाय त्यांना चित्रपट, संगीत, क्रीडा, मनोरंजन या क्षेत्रांची मनापासून आवड आहे. याच हेतूने या चित्रपटाशी सहयोग करून त्याची निर्मिती केली आहे.

याबद्दल पुनीत बालन म्हणाले, ‘‘समाज परिवर्तन ही काळाची गरज आहे. या चित्रपटाचा विषय याच्याशीच निगडित असल्याने या चित्रपटाची निर्मिती करण्याचे ठरवले. त्याचबरोबर, आपल्या शेतकऱ्यांनी शेती राखायला हवी हा संदेशही देणे महत्त्वाचे वाटले. यापुढेही मनोरंजन क्षेत्रात आम्ही कार्यरत राहू आणि नवनवीन प्रतिभावान कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊ.’

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत