मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक रद्द, वाहतूक विस्कळीत

मुंबई : रायगड माझा वृत्त 

शनिवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने आजचा मेगाब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची आणखी तारांबळ उडू नये यासाठी मध्य रेल्वेने आजचा विद्याविहार-भायखळादरम्यानचा ब्लॉक रद्द केला आहे. मध्य रेल्वेच्या विद्याविहार-भायखळा स्थानकादरम्यान अप धीम्या मार्गावर पाच तासांचा म्हणजे सकाळी 11 वाजून 20 मिनिटे ते दुपारी 4 वाजून 20 मिनिटे यादरम्यान ब्लॉक घेण्यात येणार होता. पण मध्य रेल्वेची वाहतूक आधीच तासभर उशीराने सुरू असल्याने मेगा ब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पण दुसरीकडे मुंबईच्या पश्चिम आणि हार्बर या रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या सांताक्रुझ-गोरेगाव स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर दोन्ही दिशेने सकाळी साडेदहा ते दुपारी साडेतीन या वेळेत ब्लॉक असेल. तर हार्बर मार्गावरही ब्लॉक घेण्यात येणार असून हार्बर मार्गाच्या कुल्रा आणि वाशी स्थानकादरम्यान सकाळी 11 वाजून 10 मिनिटं ते दुपारी 4 वाजून 10 मिनिटांपर्यंत ब्लॉक घेतला जाईल.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत