मृत मुलीने लिहीलेल्या एका कवितेमुळे त्याला झाली जन्मठेप

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त 

एका मुलीच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या एका १९ वर्षीय मुलाला जन्मठेपेची शिक्षा झाल्याने उरलेलं सगळं आयुष्य तुरुंगात काढावं लागणार आहे. त्याने जिची हत्या केली त्या १७ वर्षांच्या मुलीने लिहीलेल्या एका कवितेमुळे त्याला जन्मठेप झाली आहे. एकतर ही कविता आणि दुसरं एक युट्युबवरचं गाणं हे दोन्ही पुरावे कोर्टाने ग्राह्य धरले आहेत.

सार्थक कपूर असं या गुन्हेगाराचं नाव आहे. मृत श्रेयाने लिहीलेली एक कविता कोर्टात सादर करण्यात आली. हत्येपूर्वी सार्थक तिला त्रास देत होता, याचे संकेत त्या कवितेतून मिळतात. कविता श्रेयानेच लिहीलेली आहे हे फोरेन्सिक तपासातून स्पष्ट झालेलं आहे. या कवितेसह युट्युबवरचं एक गाणंही पुरावा म्हणून सादर करण्यात आलं. त्यात जशी हत्या करण्यात आली, तशाच प्रकारे सार्थकने श्रेयाची हत्या केली.

बारावीत शिकणाऱ्या श्रेयाची मागील वर्षी १६ ऑगस्ट रोजी दिल्लीत हत्या झाली होती. कोचिंग क्लासवरून न परतल्याने कुटुंबीयांनी पोलिसांना कळवलं. नंतर तपासात सार्थकला अटक करण्यात आली. त्याने आपल्या गुन्ह्याची कबुलीही दिली होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.