मॅगझिनच्या कव्हरपेजवर झळकणार सुहाना खान

रायगड माझा ऑनलाईन 

बॉलीवुडचा किंग खान अर्थात शाहरूख खान व गौरी खान यांची मुलगी सुहाना हिच्या बॉलिवूड पदार्पणाकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. पण आता सुहानाने यादिशेने पहिले पाऊल टाकले आहे. सुहाना लवकरच एका जगप्रसिद्ध मॅगझिनच्या कव्हरपेजवर झळकणार आहे. तिचा मॅगझिन डेब्यू ठरला आहे आणि ऑगस्टचा मुहूर्त तिच्या या मॅगझिन डेब्यूला मिळाला आहे.

याबाबतचे संकेत अलीकडे एका अवार्ड शोमध्ये गौरी खान हिने दिले होते. एका मॅगझिनसाठी सुहानाने शूट केले आहे. माझ्यासाठी या वर्षातील ही सर्वात मोठी उत्साहवर्धक बातमी असल्याचे गौरीने त्यावेळी सांगितले होते. पण त्यावेळी गौरीने ते मॅगझिन कोणते हे गुलदस्त्यात ठेवले होते. पण त्याचाही खुलासा आता झाला आहे.

यासंदर्भात बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, जगप्रसिद्ध “वोग’ मॅगझिनच्या कव्हरपेजवर शाहरूख खान व गौरी खानची लेक झळकणार आहे. सुहानाचा स्टनिंग अवतार आपल्या सर्वांना “वोग’ मॅगझिनच्या ऑगस्ट महिन्याच्या अंकाच्या कव्हरपेजवर पाहायला मिळेल. या मॅगझिनसाठी नुकतेच सुहानाने फोटोशूट केले. यानिमित्ताने सुहानाची पहिली मुलाखतही आपल्याला वाचायला मिळणार असल्याचे समजते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत