मेघडंबरीत काढलेल्या फोटोमुळे रितेश देशमुख अडचणीत, रितेश देशमुखने मागितली माफी

रायगड : रायगड माझा वृत्त

चित्रपटामध्ये एकापेक्षा एक थरारक दृश्ये देणारा सिनेअभिनेता रितेश देशमुख याने रायगड किल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मेघडंबरीत बसून फोटो काढला आहे. त्याच्या या फोटोसेशनमुळे तो वादात अडकण्याची शक्यता आहे. या संदर्भात महाड येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाडचे प्रांतांकडे निवेदन सादर करून निषेध केला आहे.

मेघडंबरीत काढलेल्या फोटोमुळे रितेश देशमुख अडचणीत, रितेश देशमुखने मागितली माफी

यगड किल्यावरील मेघडंबरीत शिवरायांचा पुतळा बसवलेला आहे. सारे शिवभक्त त्या ठिकाणाचे पावित्र्य पाळत असतात. मेघडंबरीच्या बाजूला उभे राहून अनेकजण फोटोग्राफी करतात. मात्र रितेश देशमुख याने शिवरायांच्या मेघडंबरीत बसून फोटो काढल्याने तो वादाचे कारण ठरला आहे. रितेश सोबत या मेघडंबरीच्या इथे दिग्दर्शक रवी जाधव, लेखक विश्वास पाटील हे देखील होते. दरम्यान रितेश देशमुख याने या संदर्भात शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असल्याच्या पोस्ट पसरू लागल्या नंतर त्याने ती पोस्ट डिलीट करून माफी मागितली आहे.

आजन्म त्यांच्या पायावर डोकं ठेवलं त्यांच्या पायापाशी होऊन बसण्याची अनेक वर्षांपासून इच्छा होती. तिथे बसून आहि काही छायाचित्रे घेतली आणि ती सोशल माध्यमातून पोस्ट केली. यामागे फक्त भक्तिभाव होता. ती छायाचित्रे घेताना किंवा बसतं आमच्या मनात कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. मात्र आमच्या कृत्यामुळे कोणीही दुखावलं गेलं असेल तर त्याची आम्ही अंतःकरणपूर्वक माफी मागतो. : रितेश देशमुख

दरम्यान रितेश आणि त्याच्या सोबत असलेले दिग्दर्शक रवी जाधव, लेखक विश्वास पाटील आणि

अनंत देशमुख हे रायगड किल्ल्याला भेट देण्यासाठी रोपवेने जात असताना तांत्रिक बिघाडामुळे रोपवे मध्येच थांबला होता. रोपवे थांबल्याने चौघेही मध्येच अडकले होते. अर्ध्या तासानंतर रोपवे प्रशासनाने प्रयत्न करुन रोपवे सुरू केला तेव्हा या सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत