मेट्रो कारशेडची स्थगिती तातडीने उठावा; भाजपाची मागणी 

महाराष्ट्र News 24 वृत्त 

अहंकारापोटी मुंबईकरांच्या मेट्रो कारशेडला दिलेली स्थगिती तातडीने उठवा अशी मागणी करीत आज माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजपा आमदारांनी विधानभवन पायऱ्यांवर निदर्शने केली. 

Image result for मेट्रो कारशेड स्थगिती उठविण्यासाठी भाजप आमदारांची निदर्शने"

नागपूर मध्ये आज विधिमंडळाच्या कामकाजाला सुरवात झाल्यानंतर भाजपा आमदार आशिष शेलार यांच्यासह आमदार राम कदम, अमित साटम, कालिदास कोळंबकर, पराग शहा, भारती लव्हेकर यांनी स्थगिती सरकार हाय हाय, मेट्रो कारशेडवरील स्थगिती तत्काळ उठवा, मुंबईकरांचे रोज होणारे पावणे पाच कोटींचे नुकासान थांबवा, मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देणाऱ्या सरकारचा निषेध असो, सामनात खूप.. सभागृहात चूप.. अशा घोषणा देऊन विधानभवन परिसर आमदारांनी दणाणून सोडला.

याबाबत माध्यमांशी बोलताना आमदार आशिष शेलार म्हणाले की, मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने अत्यंत वेगाने मेट्रोची कामे सुरु केली आणि ती पूर्णत्वास जात असतानाच नव्या आलेल्या ठाकरे सरकारने मेट्रोच्या कामाला स्थगिती दिली. त्यामुळे मुंबईकरांचे रोज पावणे पाच कोटींचे नुकासान होत असून प्रकल्पाची किंमत वाढते आहे. प्रकल्पाला विलंब होत आहे. केवळ अहंकारा पोटी स्थगिती देण्यात आली असून ती तत्काळ उठवावी अशी मागणी यापूर्वी आम्ही सरकार कडे केली असून आम्ही या स्थगिती सरकारचे लक्ष वेधले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत