मेळघाटतील धारणीच्या बाजारपेठेला भीषण आग; १० पेक्षा अधिक दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी

अमरावती : महाराष्ट्र NEWS 24 ऑनलाईन

अमरावती जिल्ह्यातील धारणी शहरातील बाजार पेठेतील एका हॉटेलला आज पहाटे चार वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. आगीमुळे या रांगेत असलेल्या इतरही दुकानांना ही आग लागली. तर यामध्ये लाखोंचे नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशामक बंब घटनास्थळी पोहचले. आणि त्यांनी आग आटोक्यात आणली आहे.

या आगीत बाजारपेठेत असलेले चार मोठे कपडा दुकान, चप्पल दुकान, हॉटेल आदी दुकाने जळाली आहेत. मात्र नेमकी आग कशाने लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत