मैत्रिणीचे लाड पुरवण्यासाठी 13 दुचाकींची चोरी, नाशिकमध्ये दोन अल्पवयीन मुलं ताब्यात

नाशिक : रायगड माझा वृत्त 

मैत्रिणीचे लाड पुरवण्यासाठी 13 दुचाकींची चोरी, नाशिकमध्ये दोन अल्पवयीन मुलं ताब्यात

मैत्रिणीचे लाड पुरवण्यासाठी नाशिकच्या दोन अल्पवयीन मुलांनी एक दोन नव्हे तर तब्बल 13 दुचाकी चोरल्याचं उघडकीस आलं आहे. चोरलेल्या दुचाकी विकून मिळालेल्या पैशातून ते मैत्रिणींची हौसमौज पूर्ण करत होते. पण व्हॅलेन्टाईन्स डेच्या एक दिवस आधीच ही कारवाई केल्याने शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.

लहान मुलांवर लहानपणापासूनच टीव्ही मालिकांचा पगडा दिसतो. वय, परिस्थिती कशीही असो मैत्रीण पाहिजेच असाच समज सध्या तरुणांचा झाला आहे, त्यात अल्पवयीन मुलंही आलीच. अकरावीत शिकणाऱ्या या दोन्ही अल्पवयीन मुलांना मैत्रिणी आहेत. मात्र त्यांची घरची परिस्थिती बेताची असल्याने, मैत्रिणींचे लाड पुरवण्यासाठी तसंच खर्चासाठी पैसा आणायचा कुठे, असा प्रश्न त्यांना सतावत होता. त्यावर उपाय म्हणून त्यांनी शहरातील दुचाकी चोरण्याचं ठरवलं.

गेल्या काही महिन्यात त्यांनी अनेक दुचाकींची चोरी केली आहे. त्या दुचाकी विकून त्यांनी बराच पैसाही मिळावला. त्यापैकी 13 दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून इतरांचा शोध सुरु आहे. पोलिसांनी दोन्ही प्रेमवीरांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी बालसुधारगृहात केली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत