मोकाट गुरांमुळे भाजीपाला लागवडीचे नुकसान

गुरेबंदीसाठी अनेकवेळा तक्रारी करूनही प्रशासनाचे दुर्लंक्ष 

नेरळ : कांता हाबळे 

कर्जत तालुक्यातील साळोख ग्रामपंचायत हद्दीत मोठया प्रमाणात मोकाट गुरांनी हैदोस घातला असून या मोकाट गुरांनी माले गावात भाजीपाला लागवडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत.

माले गावातील शेतकरी अरूण वेहेळे हे गेली २० वर्षांपासून शेती व्यवसाय करत आहेत. त्यांनी आपल्या एक एकर शेतात नदीचे पाणी घेवून कारली, दुधी, शिराळी अशी भाजीपाला लागवड केली आहे. शेतात ते स्वतः प्रंचड मेहनत घेत आहेत. असे असताना मोकाट गुरांचा त्यांना मोठया प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या भागात मोकाट गुरे असल्याने या गुरांनी शेतात शिरून अनेकवेळा भाजीपाला लागवडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. या संदर्भात शेतकरी अरूण वेहेळे यांनी साळोख ग्रामपंचायत, कर्जत तहसिलदार, नेरळ पोलिस ठाणे, वन विभाग यांना गुरेबंदीसाठी पत्रव्यवहार केला आहे. परंतू याकडे सर्वांनीच दुर्लंक्ष केल्याने मोकाट गुरे शेतात येवून पिकांचे नुकसान करत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर या मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी शेतकर्‍यांकडून करण्यात येत आहे.

मोकाट गुरांनी भाजीपाळा लागवडीचे प्रंचड नुकसान केले आहे. अनेकवेळा गुरेबंदीसाठी ग्रामपंचायत, नेरळ पोलिस ठाणे, कर्जत सहसिलदार, कर्जत पंचायत समिती यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. परंतू सर्वांनीच दुर्लंक्ष केल्याने मोकाट गुरे शेतीचे प्रचंड नुकसान करत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर  या मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्यात यावा. – अरूण वेहेळे : शेतकरी, माले

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत