मोटेच्या तलावात बुडून इसमाचे निधन -शहरात शोककळा

 नागोठणे :महेंद्र माने 

शहराच्या मध्यवर्ती असलेल्या मोटेच्या तलावात मंगळवार 17 जुलै रोजी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास पोहायला गेलेला इसम दम लागल्याने पाण्यात बुडून मरण पावला. येथील ग्रामपंचायतचे कर्मचारी तसेच खडकआळीतील रहिवाशी चंद्रकांत मारुती तेलंगे (वय 48) हे  घरापासून जवळच असलेल्या मोटेच्या तलावात मंगळवार 17 जुलै रोजी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास पोहायला उतरले ,पोहत पलीकडच्या बाजूला जाताना तलावाच्या मध्यभागी आल्यावर चंद्रकांतला दम लागल्याने ते  पाण्यात बुडाले .

त्यांना शोधण्यासाठी पोलिस व खडकआळीतील तरुण छोट्या बोटीच्या साह्याने तलावात उतरले. सदरील तलाव हा चारी बाजूने बंदीस्त असला तरीही तो खूप मोठा व खोल असल्यामुळे त्याला शोधण्यास शोध व बचाव पथकास त्रास होवू लागला बर्‍याच प्रयत्नानंतर शेवटी गळाला रस्सी बांधून पाण्यात शोध घेतला असता;त्याच्या बनियनला गळ अडकल्याने मृतदेह  बाहेर काढण्यात आला . मोठ्या चौकोनी तलावात इसम  बुडाल्याचे शहरात समजताच तलावाच्या सभवताली बघ्यांची खूप गर्दी झाली होती. सदरील इसमाच्या पार्थिवावर रात्री वैकुंठ स्मशान भूमीतत्यांचे  मित्र परिवार, नातेवाईक,सामाजिक-राजकीय,समाज बांधव तसेच शहर व विभागातील नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. चंद्रकांतच्या पश्चात आई लक्ष्मी तेलंगे, पत्नी सुरेखा तेलंगे,संकेत तेलंगे हा मुलगा, चित्रा तेलंगे व विद्या साळुंके (विवाहीत) या दोन मुली,जावई व नातू असा परिवार आहे. शांत व मनमिळावू स्वभावाच्या चंद्रकांतचे अकस्मात निधन झाल्याने नागोठणे शहरावर शोककळा पसरली

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत