मोदींची सीईओंसोबत बैठक, भारतातील गुंतवणुकीवर चर्चा

 रायगड माझा ऑनलाईन टीम
narendra-modi

दावोस – येथे सोमवारपासून ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या 48व्या वार्षिक सभेला सुरुवात झाली. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी दावोसमध्ये आहेत. यावेळी मोदींनी जगभरातील विविध कंपन्यांच्या सीईओंसोबत चर्चा केली.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी मोदींनी भारताचा विकास आणि देशातील गुंतवणुकीच्या संधी याबाबत सीईओंना माहिती दिली. भारत हा गुंतवणुकीसाठी पोषक देश आहे, याचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न मोदींनी केला. गेल्या 20 वर्षांमध्ये भारतीय पंतप्रधानांनी या परिषदेला हजर राहण्याची ही पहिलीच वेळ आहे.

दरम्यान, मोदींनी स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष अॅलेन बेर्सेत यांची देखील भेट घेतली. द्विपक्षीय संबंध सुधारण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. अॅलेन बेर्सेत यांनी याबाबत ट्विट केले आहे. नरेंद्र मोदी यांचे मंगळवारी दावोसमध्ये भाषण होणार आहे. मोदींसह वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य वरिष्ठ सरकारी अधिकारीही या परिषदेसाठी हजर आहेत. जागतिक पातळीवरील अनेक कंपन्यांचे सीईओ आणि गुंतवणूकदारांचे मोदींच्या या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत